Zoo visitors: रमजान काळात प्राणीसंग्रहालयाला ‌‘अच्छे दिन‌’

पर्यटकांचा वाढला ओघ; दैनंदिन महसूल तीन लाखांवर, व्यवस्थापनाला दिलासा
Zoo
Zoo Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : रमजान काळात भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढल्याचे दिसून आले. या काळात रोज पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे, दैनंदिन महसूल 2 ते 3 लाखांवर पोचल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणी सापडलेल्या संग्रहालय व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकंदरीत रमजानचा सण प्राणीसंग्रहालयासाठी लाभदायक ठरल्याचे दिसून आले.

शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाचा विकास करून विविध प्राणी आणण्यात आले आहेत. त्यामुळे, बेळगावसह महाराष्ट्र व गोवा राज्यातून पर्यटकांचा ओघ सुरु आहे. म्हैसूर प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधून याठिकाणी सिंह, वाघ, बिबटे, मगर, कोल्हे, तरस, अस्वल, हरीण, चितळ, सांबर या प्राण्यांसह दुर्मीळ पक्षी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, पर्यटकांची पावले प्राणीसंग्रहालयाकडे वळू लागली आहेत.

मात्र, मध्यंंतरी पर्यटकांनी पाठ फिरविल्याने महसुली उत्पन्नात घट झाली होती. परिणामी संग्रहालयातील प्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला होता. प्राणी दत्तक योजनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण, रमजान सणाच्या काळात प्राणीसंग्रहालयात पर्यटकांचा ओघ अपेक्षेपेक्षा वाढल्याने उच्चांकी महसूल जमा झाला.

तब्बल 39 एकर जागेत पसरलेल्या प्राणीसंग्रहालयात वन्यप्राण्यांबरोबरच पक्षीसंग्रहालय आणि मत्स्यालयदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमी आणि मत्स्यप्रेमीही दाखल होऊ लागले आहेत. येत्या दिवसात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पडणार आहे. त्यामुळे, एप्रिल आणि मे महिन्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाला आहे. नोकरदार, कामगार वर्गाची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय सुट्टीही संग्रहालय खुले ठेवले जात आहे. मंगळवार वगळता सर्व दिवस प्राणीसंग्रहालय सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत खुले ठेवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news