World Audiologist Day : ऐकू येणे हा अधिकार; उपकार नव्हे !

जागतिक ऑडिओलॉजिस्ट दिन विशेष
World Audiologist Day
World Audiologist Day
Published on: 
Updated on: 

आपण डोळे बंद केले तर अंधार दिसतो. पण, कान बंद केले तर माणूस एकटा पडतो. निसर्गाने दिलेली ऐकण्याची शक्ती हे मनुष्याचे एकमेकांतील नातेसंबंध जोडून ठेवण्यासाठी फार महत्वाची भूमिका निभावते. १० ऑक्टोबर जागतिक ऑडिओलॉजिस्ट दिनाच्या निमित्ताने आपण एक गंभीर पण दुर्लक्षित विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.. ऐकू येणे हा अधिकार आहे, उपकार नाही. आपण सर्वांनी मिळून या दिनानिमित्त आपल्या कानाची काळजी घेण्याचा प्रयत्न करा.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात ६.३ कोटी लोकांना कमी ऐकू येते. त्यापैकी ५० टक्के लोक ६० वर्षांखालील आहेत. ध्वनी प्रदुषणामुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळे येणारा बहिरेपणा प्रचंड वाढत चाललेला आहे. जनजागृती अभावी त्यातील १० टक्के लोकांना बहिरेपणाची जाणीव नाही. ऐकू न येणे फक्त कानाची समस्या नसून लहान वयात मुलाला ऐकू न आल्यास बालकांची भाषा व वाचा यांचा विकास मंदावतो.

तरुणांमध्ये नैराश्य येणे शिक्षणांत मागे पडणे त्याच बरोबर वयस्कर व्यक्तिंमध्ये ऐकू न आल्यामुळे अल्झायमर डिमेंशियासारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. ऐकण्याशी संबंधीत समस्या आली तर ऑडिओलॉजिस्ट ऐकण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने ऐकण्याची तपासणी करुन त्यानुसार श्रवण यंत्र कोणते लावायचे व कोणत्या श्रवण यंत्रामुळे फायदा होतो याचा सल्ला व मार्गदर्शन करतात.

समाजामध्ये श्रवणयंत्राबद्दल अनेक गैरसमजुती असतात. श्रवणयंत्र म्हणजे आवाज मोठे करणारे स्पीकर नसून सध्या डिजिटल युगात श्रवणाचे योग्य व्यवस्थापन करणारे एक मिनी कंप्युटर आहे. जे मेंदुला हरवलेले शब्द परत मिळवून देतात. कानाला न ऐकू येणारे ध्वनी पट्टीचे आवाज परत आणून देण्यास मदत करतात. श्रवणयंत्र वेळेवर लावले नाहीतर मेंदूची ऐकण्याची क्षमता मंदावते व तशीच समस्या दिर्घकाळापर्यंत लक्ष न बहिरेपणा बळकावतो. त्यानंतर श्रवणयंत्र वापरुनही व्यवस्थित ऐकायला येत नाही. त्यामुळे कानाची एकदा तसापणी करुन घ्या. बहिरेपणा लपवू नका, श्रवणयंत्र वापणे म्हणजे म्हातारपण नसून ती हुशारी आहे. कारखान्यात एअर प्लगचा वापर करा.
- नागनाथ स. गौंड, ओडिओलॉजिस्ट कृष्णा स्पीच थेरपी अँड हिअरींग क्लिनिक, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news