

बेळगाव : सीबीटीमध्ये बसमध्ये चढणार्या महिलांना हेरून गर्दीचा फायदा घेत दागिने लांबवणार्या महिलेला अटक केली. श्रीमती मनिषा मनीगंडन (वय 28, रा. तिरूपट्टूर, तामिळनाडू) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून 5 लाख 65 हजार रूपये किंमतीचे 51 ग्रॅम दागिने जप्त केले.
दीड वर्षापूर्वी 18 फेब्रुवारी 2024 रोजी येथील सीबीटीमधून प्रवास करणारी महिला ज्योती रामगौडा पाटील (रा. भोजवाडी, ता. निपाणी) या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले होते. सदर महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवत त्यांचे दागिने लांबवले. या प्रकरणाचा मार्केट पोलिसांकडून तपास सुरू होता. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णवर, उपनिरीक्षक एच. एल. केरूर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.
पोलीस नवीनकुमार ए. बी., एल. एस. कडोलकर, असीर जमादार, सुरेश एम. कांबळे, कार्तिक. जी. एम. एम. बी. ओडेयर, मल्लिकार्जुन गुदगोप्प यांनी कारवाईत सहभाग घेतला.