DK Shivakumar | सिद्धरामय्यांच्या वाटेवरच पुढे चालत राहणार : डी. के. शिवकुमार

समाज माध्यमांवर भावनिक पोस्ट, कृतज्ञता व्यक्त
DK Shivakumar
DK ShivakumarPudhari
Published on
Updated on

बंगळूर : देव आपल्याला आशीर्वाद देत नाही, तो शापही देत नाही, तो केवळ संधी देतो. माजी मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे चालत राहण्याचे माझे वचन आहे, अशा भावना केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, म्हैसूरमधील एका दुर्गम गावात जन्मलेले आणि सर्वोच्च राजकीय पदापर्यंत पोचून राज्याच्या जनतेची निस्वार्थपणे सेवा करणारे सिद्धरामय्या हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत काम करणे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करणे हे एक भाग्य होते. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होताना कर्नाटकच्या जनतेसाठी त्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या सेवेबद्दल आणि नेतृत्वाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो.

त्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या अनेक लोककल्याणकारी योजना आणि अनेक विकास उपक्रमांचा प्रभाव कर्नाटकच्या विकासाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय म्हणून कायम राहील. सार्वजनिक जीवनातील जवळपास पाच दशकांच्या काळात, त्यांनी लोककेंद्रित शासन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीला आकार दिला आहे.

२०२० मध्ये माझ्यावर केपीसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यापासून, सिद्धरामय्या एका भक्कम आधारस्तंभाप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची दूरदृष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांच्या अनुभवातून, शहाणपणातून व राजकीय दूरदृष्टीतून सतत शिकण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे. मला मनापासून आशा आहे की, कर्नाटकच्या प्रगती आणि कल्याणासाठी प्रयत्न करत असताना, त्यांचे मार्गदर्शन येणाऱ्या काळातही आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील आणि सक्षम करेल, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news