

म्हैसूर : वीकेंड पार्टीसाठी मित्रांसोबत पबमध्ये असताना तरुणांच्या दुसऱ्या गटासोबत सुरू झालेल्या हाणामारीत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 19 रोजी विजयनगर म्हैसूर येथील एका रेस्टॉरंटमध्ये घडली.
निशांत (वय 32, रा. गोकुळम) असे मृत युवकाचे नाव आहे. निशांत हा बंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. निशांत आपले मित्र संदीप व दीक्षित यांच्यासोबत पार्टीला गेला होता. पार्टीनंतर पबमधून बाहेर पडताना रॉकी व त्याच्या मित्रांनी त्याला अडवून एका क्षुल्लक कारणावरून शाब्दीक बाचाबाची केली. दरम्यान दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.
दरम्यानच्या गोंधळात निशांत पबच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. दरम्यान निशांतला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.