राष्ट्रीय महामार्गावर मांगुर फाट्यानजीक पाणी; एका लेनमधून वाहतूक सुरु

एकाच लेनमधून आंतरराज्य वाहतूक सुरू; पोलिसांसह प्रशासन घटनास्थळी तळ ठोकुन
Flood Water On National Highway At Mangur
मांगुर फाट्यानजीक आलेले पुराचे पाणीPudhari Photo
Published on
Updated on

निपाणी : मधुकर पाटील

कोल्हापूर-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर मांगुर फाट्याजवळ पाणी आल्याने एका लेनमधून दोन्ही बाजूची आंतरराज्य वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. यासाठी पोलीस व प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून आहेत. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू दोन्ही बाजूची वाहतूक सर्विस रोडने सुरू आहे. परंतु पूर्वेकडील सर्विस रोडवर पाणी आल्याने पश्चिमेकडील बाजूच्या सर्विस रोडवरून दुहेरी वाहतूक एकाच लेनमधून शुक्रवारी (दि.26) रात्रीपासून सुरू ठेवण्यात आली आहे.

Flood Water On National Highway At Mangur
निपाणी : वेदगंगेची पाणीपातळी वाढल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर पोलिस बंदोबस्त

मांगुर फाट्यानजीक कुंभार शेताजवळ महामार्गाला पर्याय ठरणाऱ्या सर्विस रस्त्याने सुरू केलेली वाहतूक मुख्य महामार्गाला जोडण्यात आली आहे. या ठिकाणी शुक्रवारी वेदगंगेच्या पुराचे पाणी येऊन तीन फुटाने वाहू लागले. दरम्यान या पाण्यातूनच कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक सुरू होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने धाव घेऊन यावर उपाययोजना म्हणून रस्ते देखभाल कंपनीच्या मदतीने आलेले पाणी निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजूला दहा फूट चर खोदून त्यामध्ये पाईप घालून पाण्याला वाट करून दिली होती. या पाण्याचा अडथळा सकाळी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत कोल्हापूरहून गावाकडे होणाऱ्या वाहतुकीसाठी कमी झाला. त्यामुळे या काळात पोलीस प्रशासनाने धिम्म्यागतीने वाहतूक सुरु ठेवली होती.

त्यादृष्टीने सीपीआय बी.एस.तळवार,उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, रमेश पवार रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या पथकाचे विभाग नियंत्रक विजय दाईंगडे,भरारी पथकाचे सुपरवायझर संतराम माळगे,अक्षय सारापुरे यासह तब्बल 25 पोलीस कर्मचारी व महामार्ग देखभाल कंपनीचे 50 कर्मचाऱ्यांनी मांगुर फाटा ते यमगर्णी पर्यंत असलेले अडथळे दूर करीत प्रशासनाने रात्री 9 नंतर दोन्हीकडील आंतरराज्य वाहतूक एकाच लेनद्वारे सुरू ठेवली आहे.

Flood Water On National Highway At Mangur
Kolhapur Flood News : मुदाळतिट्टा- निपाणी, गारगोटी- कोल्हापूर मार्ग बंद
सद्यस्थितीत मांगुर फाटा येथे महामार्गाला पर्याय असलेल्या सेवा रस्त्यावर 3 फूट पाणी आले आहे. कोल्हापूरहून निपाणीकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू होती. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने गांभीर्य ओळखून कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी आंतरराज्य वाहतूक बंद होऊ नये यासाठी पर्याय म्हणून पश्चिमेकडील बाजुने एका लेनद्वारे वाहतूक सुरू ठेवली आहे.
-बी.एस.तळवार, सीपीआय निपाणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news