Satish Jarkiholi ED Raid | वॉशिंग मशिन थेअरी जारकीहोळींवर चालणार नाही : आमदार राजू सेट

राजकीय हेतूमुळेच ईडीची कारवाई झाल्याचा आरोप
आमदार राजू सेट
आमदार राजू सेट
Published on
Updated on

बेळगाव : मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्याशी संबंधित नेत्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांमागे निव्वळ राजकीय हेतू असल्याचा आरोप आमदार राजू सेट यांनी केला आहे. विरोधकांची वॉशिंग मशीन थिअरी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर कोणताही परिणाम करणार नाही, असे त्यांनी रविवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार सेट यांनी मंत्री जारकीहोळी यांच्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सतीश जारकीहोळी हे केवळ एका समाजाचे नेते नसून संपूर्ण राज्यातील प्रभावशाली नेते तसेच मोठे उद्योजक आहेत. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे राजकीय हल्ले आणि दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. मात्र, अशा सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांकडून वॉशिंग मशीनच्या राजकारणाचा वापर करून सतीश जारकिहोळी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या उद्योगसमूहांकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा राजकीय डावपेचांमुळे काँग्रेस नेत्यांना कोणतीही हानी होणार नाही, असे आमदार सेट यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news