Viththal Halgekar | विकासकामांचे श्रेय इतरांनी घेऊ नये: आ. विठ्ठल हलगेकर

शहरांतर्गत महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन
Viththal Halgekar |
खानापूर : माहिती देताना आ. विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बसवराज सानिकोप, सदानंद पाटील, चेतन मणेरीकर व इतर.Pudhari Photo
Published on
Updated on

खानापूर : खानापूर शहरांतर्गत महामार्गाच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा केला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुमारे पावणे पाच किलोमीटर अंतर रस्त्याच्या विकासासाठी 14 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असून त्या कामाला सुरुवातही झाली आहे. या कामाचे काँग्रेसच्या नेत्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला आ. विठ्ठल हलगेकर यांनी लगावला.

शहरांतर्गत महामार्गाच्या कामाचे बुधवारी (दि.1) त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आ. हलगेकर म्हणाले, तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा आणि अति वर्दळीचा रस्ता असल्याने नवा महामार्ग शहराबाहेरून गेल्यामुळे जुन्या शहरांतर्गत रस्त्याच्या विकासाचा प्रस्ताव ना. गडकरी यांच्याकडे सादर केला होता. केवळ निवेदन देऊन गप्प बसलो नाही तर अनेक वेळा दिल्लीवारी करून मंजुरीसाठी पाठपुरावा केला. 14 कोटीच्या निधीतून करंबळ क्रॉस ते मराठा मंडळ पदवी कॉलेज पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. सात मीटर रुंदीचा व दहा इंच जाडीचा भक्कम रस्ता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, आमदार निधीतून शहराच्या विकासासाठी तीन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत-2 योजनेतून पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पारिश्वाड ते बिडी रस्त्यासाठी दहा कोटीचा निधी मंजूर झाला असून कामालाही सुरुवात झाली आहे. लालवाडी ते कोडचवाड, आवरोळी ते बिडी आणि पारिश्वाड ते इटगी या तीन रस्त्यांच्या कामासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे, असे सांगितले.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी आणि आमदार हलगेकर यांच्या जोडीने रस्ते आणि रेल्वेशी संबंधित विकास कामांसाठी यापुढेही पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी अध्यक्ष संजय कुबल, अ‍ॅड. चेतन मणेरीकर, गुंडू तोपिनकट्टी, युवा नेते सदानंद पाटील, आप्पया कोडोळी, पंडित ओगले, राजू रायका, प्रशांत लक्केबैलकर, प्रवीण पाटील आदि उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news