Karnataka crime: कोल्‍हारमध्‍ये घरफोडी, ९.६७ लाखांचा ऐवज लंपास

घरातील सर्वजण बाहेर गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला
Karnataka crime: कोल्‍हारमध्‍ये घरफोडी, ९.६७ लाखांचा ऐवज लंपास
Published on
Updated on

विजापूर : घरात कोणी नसल्‍याचे पाहून सुमारे ९ लाख ६७ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना जिल्ह्यातील कोल्हार शहरातील संगमेश्वर चौक परिसरात उघडकीस आली आहे. संगमेश शिवप्पा पुजारी यांच्या घरात ही घटना घडली.

घरातील सर्वजण बाहेर गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ट्रंकचे कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले सुमारे ६० ग्रॅम सोने, ९० ग्रॅम चांदी आणि ५० हजार रुपये लंपास केले. चोरीस गेलेल्या साहित्‍याची किंमत सुमारे ९ लाख ६७ हजार रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चोरीची माहिती देताना संगमेश पुजारी म्हणाले, आमच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निडगुंडी विभागाचे सीपीआय शरणप्पगौडा गौडर यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. घटनेची नोंद कोल्हार पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news