Online Fraud: एसपींच्या नावे बनावट फेसबुक खाते

लाखोंची फसवणूक : गोकाक तालुक्यातील दुरदुंडी येथील एकाला अटक
Online Fraud
Online FraudPudhari
Published on
Updated on

विजापूर : विजापूर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते व ई-मेल आयडी तयार करून नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला सायबर पोलिसांनी अटक केली.

याबाबत 20 मे 2024 रोजी बबलेश्वर तालुक्यातील तिगणीबिदरी येथील सुरेश अथणी यांनी विजापूर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संशयिताने पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तसेच ई-मेल आयडी तयार करून तक्रारदाराशी संपर्क साधला होता.

बांधकाम खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्‍याने तक्रारदाराकडून 5 लाख 4 हजार 600 रुपये उकळले. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करताना सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील दुरदुंडी येथील हनुमंत भजंत्री याला अटक केली आहे. चौकशीवेळी संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

त्‍याने याच पद्धतीने हुबळी, शिमोगा आणि इतर ठिकाणीही विविध अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाईल तयार करून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news