Vijapur bribery case: जिल्हाधिकारी कार्यालयातच लाचखोरी

विजापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले
Bribery Case
Bribery Case Pudhari
Published on
Updated on

विजापूर : विजापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी जागेच्या नकाशाला मंजुरी देण्यासाठी द्वितीय श्रेणी सहाय्यक अरविंद पवार आणि संगणक ऑपरेटर अयुब तोनश्याळ यांनी 15 हजारांची लाच मागितली होती. लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी दुपारी सापळा रचून लाच घेत असताना दोघांना पकडले. तसेच लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. विजापूर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news