

विजापूर : सिद्धेश्वर संस्थेच्या संक्रांती महोत्सवानिमित्त सिद्धेश्वर मंदिरासमोर बुधवारी होम-हवन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. यावेळी तिळगूळ वाटप करून आपुलकी व मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यात आले.
सिद्धेश्वर संस्थेच्यावतीने आमदार बसनगौडा पाटील (यत्नाळ) यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12.45 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत होम-हवन कार्यक्रम भक्तीभावाने पार पडला. अर्घ्य, पाद्य, आचमन आदी विधींसह अभिषेक करण्यात आला. हावेरी जिल्ह्यातील पकिरय्या शास्त्री, सिद्धरामय्या शास्त्री, बसय्या शास्त्री तसेच बुदय्या हिरेमठ, षडाक्षरय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली होम-हवन विधी झाले. त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर उत्सवमूर्ती व नंदीकोलची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बसय्या एस. हिरेमठ, उपाध्यक्ष सं. गु. सज्जन, सचिव सदानंद देसाई, संयुक्त सचिव बी. एस. सुगूर, कोषाध्यक्ष शिवानंद नीला, जत्रा समितीचे गुरू एस. गच्छिनमठ, एस. एच. नाडगौड, डॉ. सुनील उकमणाळ, एम. एस. रुद्रगौडर, सायबण्णा भुवी, नागप्पा गुग्गरी, उमाकांत वनरोटी, बसवराज कोरी, सुधीर चिंचली, राजशेखर मगीमठ आदी मान्यवर व भाविक उपस्थित होते.