Vijapur Theft Case: शंभरच्या ‘फोनपे’ तून चोरीचा उलगडा

चोरीस गेलेल्‍या जेसीबीसह दोघे ताब्‍यात
Vijapur Theft Case: शंभरच्या ‘फोनपे’ तून चोरीचा उलगडा
Published on
Updated on

विजापूर : सिंदगी तालुक्यातील गोलगेरी येथे घरासमोर उभा केलेला नवीन जेसीबी रातोरात चोरीस गेल्याची घटना घडली. पण पेट्रोल पंपावर केलेल्या अवघ्या १०० रुपयांच्या ‘फोन पे’ व्यवहारातून पोलिसांनी या चोरीचा छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे.

सायपन भगवान यांनी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून नवीन जेसीबी खरेदी केला होता. पूजा करून त्यांनी तो घरासमोर उभा केला होता. सकाळी उठल्यावर जेसीबी चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रात्रीच्यावेळी दोन चोरट्यांनी जेसीबी चोरल्‍याचे स्पष्ट झाले. याबाबत कलकेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. चोरट्यांनी चलाखीने जेसीबीमधील जीपीएस यंत्रणा कापून टाकली होती. सीसीटीव्हीमध्ये दोनजण दुचाकीवर येताना दिसले असून एकाने जेसीबी चालवून नेला. दुसरा पुढे दुचाकीवरून मार्गदर्शन करत होता.

देवर हिप्परगी येथील एका पेट्रोल पंपावर आरोपींनी ‘फोन पे’द्वारे १०० रुपयांचे पेट्रोल भरले होते. या व्यवहाराच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. संबंधित मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेत पोलिसांनी शिवाजी रायतमुरे व हुवण्णा बंडागर या दोघांना अटक केली. आरोपींनी चोरी केलेला जेसीबी स्वतःचा असल्याचा बनाव करून तो महाराष्ट्रातील हुलजंती येथे नेला होता. तसेच कमी दरात विक्री करण्याचाही प्रयत्न केला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले असून त्यांनी यापूर्वी आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news