Vijapur roof collapse incident: विजापुरात घराचे छत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

घराचे छत कोसळून एका वृद्ध महिलेचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील निडगुंदी येथील गौरीश्वर मंदिराजवळ घडली
Vijapur roof collapse incident: विजापुरात घराचे छत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू
Published on
Updated on

विजापूर : घराचे छत कोसळून एका वृद्ध महिलेचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील निडगुंदी येथील गौरीश्वर मंदिराजवळ घडली. महादेवी वारद (वय ५५, रा. निडगुंदी) असे मृत महिलेचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्यांचे जुने घर ओले झाले होते. पहाटेच्या सुमारास घराचे छत अचानक कोसळल्याने महादेवी वारद या ढिगाऱ्याखाली सापडल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घराच्या बाहेर झोपलेले त्यांचे पती शिवानंद वारद हे थोडक्यात बचावले. घटनास्थळी निडगुंदी पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

महादेवी वारद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद मिळवली पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news