Vande Bharat Train: 15 मार्चपासून वंदे भारत सुधारित वेळापत्रकाप्रमाणे

नैऋत्य रेल्वेने सात वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक 15 मार्चपासून लागू होणार आहे
Vande Bharat Train
Vande Bharat TrainPudhari
Published on
Updated on

बेळगाव : नैऋत्य रेल्वेने सात वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक 15 मार्चपासून लागू होणार आहे. पूर्वीच्या वेळापत्रकात दोन ते चार मिनिटांचा फरक असेल, अशी माहिती नैऋत्य रेल्वे हुबळीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिली.

रेल्वे क्रमांक 20669 हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस बेळगावला सकाळी 7:05 ऐवजी 7:10 वाजता आणि घटप्रभेला 7:48 ऐवजी 7:50 वाजता पोचणार आहे.रेल्वे क्रमांक 20661 बंगळूर-धारवाड वंदे भारत एक्सप्रेस दावणगेरीला सकाळी 9.30 वाजता पोचत होती. ती आता 9.32 वाजता पोचणार आहे. हावेरी 10.20 वाजता पोचणारी 10.22 वाजता येणार आहे. हुबळीला 11.15 येत होती. ती आता सुधारीत वेळेप्रमाणे 11.20 वाजता येईल. रेल्वे क्रमांक 20662 धारवाड- बंगळूर वंदे भारत एक्सप्रेस हावेरीला दुपारी 2.48 वाजता पोचत होती ती आता दुपारी 2.50 वाजता पोचणार आहे. दावणगेरीला दुपारी 3.33 ऐलजी 3:35 ला येणार आहे. तुमकुर आणि यशवंतपूर स्टेशन वेळेत कोणताही बदल होणार नाही.

रेल्वे क्रमांक 26751 बेळगाव- बंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस हावेरी रेल्वेस्टेशनवर सकाळी 8.42 वाजता येत होती. ती आता 8.44 वाजता येणार आहे. ही रेल्वे दावणगेरीला सकाळी 9.28 पोचणारी 9.30 वाजता पोचेल. तुमकूरला दुपारी 12.15 येणारी एक्सप्रेस 12.17 वाजता पोचणार आहे. सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे बंगळूरला ही रेल्वे 3.25 वाजता पोचेल.

रेल्वे क्रमांक 20704 यशवंतपूर-काचेगुडा वंदे भारत एक्स्प्रेस हिंदुपूर स्थानकावर सुधारित वेळापत्रकाप्रमाणे दुापरी 3.55 ऐवजी 3.57 वाजता येईल. त्याचप्रमाणे रेल्वे क्रमांक 20703 काचेगुडा-यशवंतपूर वंदे भारत एक्सप्रेस हिंदुपूरला दुपारी 12.17 वाजता पोचणारी रेल्वे दोन मिनिटे उशीरा म्हणजे 12.19 वाजता येईल. प्रवाशांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन नैऋत्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news