Belgaum News: युनियन जिमखान्याला टाळे

गोळीबारानंतर कॅण्टोन्मेंट बोर्डाची कारवाई : पोलिसांसह सैन्यदल अधिकाऱ्यांची उपस्थिती
Belgaum News: युनियन जिमखान्याला टाळे
Published on
Updated on

बेळगाव : युनियन जिमखाना क्लबमध्ये झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेनंतर कॅण्टोन्मेंट प्रशासनाने गुरुवारी (दि. १६) मोठी कारवाई करत क्लबला टाळे ठोकून संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. सैन्यदलाचे अधिकारी, कॅण्टोन्मेंटचे कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

पोलिस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी (ता. १४) रात्री झालेल्या गोळीबारामुळे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून विशेष पथके बेळगावसह महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि चंदगड परिसरात संशयितांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरेश जालगार यांच्या फिर्यादीवरून प्रफुल्ल पाटील व अन्य चार ते पाच संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर युनियन जिमखाना व्यवस्थापनाच्या फिर्यादीवरुन क्लबमध्ये घुसून तोडफोड व नासधूस केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईपूर्वी युनियन जिमखाना व्यवस्थापनाच्या नावे प्रवेशद्वारावर नोटीसही लावण्यात आली. कॅण्टोन्मेंट प्रशासनाने १० जुलै रोजी नोटीस पाठवून १६ जुलै रोजी जिमखाना बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना दिल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. त्यानुसार गुरुवारी नियोजित कारवाई करण्यात आली.

जिमखान्यावर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील क्रीडा क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे बोलले जात असले तरी या कारवाईवर व्यवस्थापनाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news