

उचगाव : येथील साहित्य संघातर्फे 25 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 18 रोजी आयोजित केले आहे. मध्यवर्ती गणेश मंदिर समोर उभारण्यात आलेल्या शामियान्यामध्ये संमेलन होणार असून संमेलनाध्यक्षपदी इंद्रजित देशमुख राहणार आहेत.
पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात डॉ. संजय उपाध्ये यांचे मन करा रे प्रसन्न या विषयावर व्याख्यान होणार असून तिसऱ्या सत्रात कथाकार जयवंत आवटी यांचे कथाकथन होणार आहे. शेवटच्या सत्रात प्रा. अजित कोष्टी यांचा हसवणूक हा कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सीए शिवकुमार शहापूरकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, अशोक कांबळे, उद्योजक व्यंकटेश शहापूरकर, बाळकृष्ण नेसरकर, डॉ. सोनाली सरनोबत, बसवंत मायाण्णाचे, प्रेमानंद गुरव, दिनकर पावशे यांच्याहस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन धनंजय जाधव, ग्रंथदिंडी मिरवणूक प्रारंभ संजय सुंठकर, पुस्तक प्रदर्शन उद्घाटन मराठा बँक व्हा. चेअरमन शेखर हंडे, जयवंत बाळेकुंद्री, राजू जाधव, शिवपुतळा पूजन मराठा बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार राजेश पाटील, काडा अध्यक्ष युवराज कदम, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, सिद्धार्थ हुंदरे, दीपक पाटील, मराठा बँक संचालक मोहन बेळगुंदकर, बी. एस. होनगेकर, रघुनाथ बांडगी, अशोक हुक्केरीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.