Two Brothers Drowning | दोघा भावांचा बुडून मृत्यू

मुडलगी तालुक्यातील घटना : पोहता येत नसल्याने गमावला जीव
 Two Brothers Drowning | दोघा भावांचा बुडून मृत्यू
Published on

बेळगाव : ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ६) दुपारी मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावाजवळ घडली. सागर बाबू मादर (वय १५) व प्रवीण बाबू मादर अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, धर्मट्टीतील सागर व त्याचा भाऊ प्रवीण गावाजवळील ओढ्यावर गेले होते. यावेळी सागर पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पोहता न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. भावाला वाचविण्यासाठी प्रवीणही पाण्यात उतरला. दुर्दैवाने त्यालाही पोहता येत नसल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबविली. अखेर दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाची नोंद मुडलगी पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मादर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news