

Truck loaded with mangoes overturns in front of Halga Cement Godown, no casualties
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
हुबळी हानगल येथून मुंबई मार्केटकडे जात असलेल्या कॅन्टर गाडीला अपघात झाला. स्लीपर बसला वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरने कॅन्टर गाडी डिव्हायडरच्या बाजूने घेतल्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जर गाडी स्लीपर बसला जाऊन आदळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. केंटर गाडीच्या ड्रायव्हरने आपला जीव धोक्यात घालून स्लीपर बसला वाचवण्यासाठी गाडी रोडच्या साईडला घेतली. यावेळी गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक पलटी झाला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे. या ट्रकमध्ये जवळपास 10 ते 12 लाख किमतीचा अंबा होता. गाडीचे जवळजवळ 22 ते 25 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.