Accident News: ट्रकच्या धडकेत मुलगा ठार, वडील गंभीर

हेमाडगाजवळ अपघात : ट्रकचालकावर गुन्हा दाखल
accident News
accident NewsPudhari
Published on
Updated on

खानापूर : भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाले. समर्थ संजय देसाई (वय 12 रा. वर्लेवाडी ता. जोयडा) हा जागीच ठार झाला तर दुचाकीस्वार त्याचे वडील संजय विठोबा देसाई (वय 40) गंभीर जखमी झाले आहेत. खानापूर-अनमोड मार्गावरील हेमाडगा जवळील वन खात्याच्या चेक पोस्टसमोर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत जाफरसाब मरदानसाब बंकापूर (52) रा. सालसेट गोवा या ट्रक चालकावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय देसाई मुलगा समर्थ याला घेऊन खानापूर येथून अनमोडच्या दिशेने जात होते. यावेळी गोव्याहून खानापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. समर्थ याच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर संजय यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना बेळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. खानापूर पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news