Sankeshwar news: संकेश्वरात रस्ता रुंदीकरणावरून तणाव

दोन गटांत बाचाबाची : तहसीलदारांकडे धाव; काम एक दिवस स्थगित
Sankeshwar news
Sankeshwar newsPudhari
Published on
Updated on

संकेश्वर : अनेक दिवसांपासून रखडलेले संकेश्वर बसस्थानक ते निडसोशी रोड रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांतून होत होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम पंचाचार्य शाळेपासून रत्नशीला हॉटेलपर्यंत अंतिम टप्प्यात आले असताना कंत्राटदाराने मोजमाप कमी केल्याने नागरिकांनी कंत्राटदारास धारेवर धरून रस्ता काम बंद पाडले. त्यामुळे दोन गटांत बाचाबाची होऊन काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

रत्नशीला हॉटेलपासून स्मशानभूमीची संरक्षण भिंत असल्याने कंत्राटदाराने रुंदी कमी करून रस्ता काम सुरू केले आहे. सदर काम नियमानुसार करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर कंत्राटदाराचे काम योग्य आहे, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे होते. तहसीलदार कट्टीमणी यांनी दोन्ही गटाकडून निवेदन स्वीकारून असिस्टंट कमिशनर व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन पाठवून एक दिवसाची वेळ मागितली आहे. त्यामुळे काम स्थगित ठेवण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रवीण मडियाळ, पालिका मुख्याधिकारी प्रकाश मठद, तलाठी एन. आर. पाटील, महसूल निरीक्षक ए. एम. कमतनूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सीपीआय शिवशरण आवजी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news