Shivam Associates Fraud Case | ‘शिवम’प्रकरणी सनी लियोनीला नोटीस; इतर कलाकारांचाही समावेश

मोठ्या रकमा हस्तांतरित झाल्याने कारवाई
Shivam Associates Fraud Case |
Shivam Associates Fraud Case | ‘शिवम’प्रकरणी सनी लियोनीला नोटीस; इतर कलाकारांचाही समावेश
Published on
Updated on

बेळगाव : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बेळगावच्या 'शिवम असोसिएट्स'च्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीला नोटीस बजावली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कंपनीचा मालक शिवानंद नीलण्णावरने लोकांकडून बेकायदेशीरपणे जमा केलेल्या पैशांचा मोठा हिस्सा सनी लियोनीसह चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे अभिनेते आणि अभिनेत्रींना हस्तांतरित केल्याचे सीआयडीच्या तपासात उघड झाले आहे.नीलन्नवरने आर्थिक फसवणुकीसाठी नेटवर्क मार्केटिंगचा वापर केला. नवीन गुंतवणूकदारांकडून आलेला पैसा जुन्या गुंतवणूकदारांना मासिक व्याज किंवा लाभांशाच्या स्वरुपात वाटला जात होता.आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलिसांनी संशयिताला अटक केल्यानंतरही लोकांचा विश्वास कमी झालेला नाही. त्याच्या अटकेच्या अवघ्या २० दिवसांत लोकांनी फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात ५ कोटींहून अधिक रुपये जमा केले आहेत.

सीआयडीने फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. नीलण्णावरच्या कंपनीचे पैसे स्वतःच्या खात्यात हस्तांतरित करुन, एक आलिशान वेलफायर, दोन मर्सिडीज बेंझ, डिफेंडर, वेर्ना आणि व्होल्वो एक्ससी९० यांसारख्या अनेक महागड्या गाड्या सुमारे ५५ कोटी रुपये खर्च करुन खरेदी केल्या आहेत. दरम्यान, आदित्यराजचा सीईओ बलराज माने अद्याप हजर झालेला नसल्याने तपासावर मर्यादा आल्या आहेत. परंतु, आतापर्यंतच्या तपासात ७ हजार गुंतवणूकदारांनी २११ कोटींची गुंतवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील १० हजार गुंतवणूकदार

सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित नीलण्णावरने एकूण ४०,७०० गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे एकूण २,४०० कोटी रुपये जमा केले. यापैकी सुमारे १०,००० गुंतवणूकदार महाराष्ट्र राज्यातील आहेत. जमा केलेल्या प्रचंड रकमेपैकी त्याने ५४० कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले. त्यातून १७० कोटी रुपयांचे नुकसान झाले. फसवणुकीसाठी त्याने सुमारे ३० बँक खात्यांचा वापर केल्याचे आढळून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news