

संबरगी : सीमाभागामध्ये ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे. कर्नाटकामध्ये प्रतिटन 3000 ते 3050 तर बेळगाव जिल्ह्यानजीक असणार्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी 3200 रुपये दराची घोषणा केली आहे. त्यामुळे सीमाभागातील कारखान्यांना उसाची टंचाई भासत आहे. जिकडे अधिक दर तिकडे ऊस असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे कारखानदारांना निश्चित केलेले गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.