

बेळगाव : तुडये जवळील ढेकोळीवाडी ( ता. चंदगड) येथील अमर जोतिबा कोकीतकर (वय 11) या शाळकरी विद्यार्थ्यांचा बुधवारी दि. 25) रोजी गावाजवळील शिवारातील शेततळ्यात मित्रांसमवेत पोहताना बुडून मृत्यू झाला.
चंदगड पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. यल्लाप्पा लक्ष्मण कोकितकर यांनी याबाबतची वर्दी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि. 25) रोजी दुपारी दीडच्या सुमारास मधला मळा या नावाच्या शेतातील पवार यांच्या शेततळ्यात अमर हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. मात्र या दरम्यान तो त्या शेततळ्यामध्ये पडून बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात बहीण आई-वडील आजी आजोबा असा परिवार आहे. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत.