

बेळगाव : नेतृत्व बदलावरून राज्यात सुरू असलेला गोंधळ लवकरच दूर करण्यात येईल, अशी ग्वाही अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी रविवारी (दि. 22) दिली.
मंत्री जारकिहोळी यांनी दिल्ली येथे अध्यक्ष खर्गे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकिय घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री के. एन. राजण्णा हेही उपस्थित होते. अध्यक्ष खर्गे यांची भेट घेतली आणि राजकीय घडामोडींवर चर्चा केली. आम्ही त्यांना लवकरात लवकर गोंधळ दूर करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार त्यांनी लवकरात लवकर गोंधळ दूर करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती जारकिहोळी यांनी दिली.
राज्यात निर्माण झालेल्या गोंधळांबाबत हायकमांडने निर्णय घेतला आहे आणि लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. खर्गेे यांनी शक्य तितक्या लवकर निर्णय घेण्याचे आणि गोंधळ लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे, असे जारकिहोळी म्हणाले. आम्हाला आशा आहे की हा प्रश्न लवकर सोडवला जावा, सत्तेबद्दल कोणताही गोंधळ आणि विधाने न करता, कोणताही विलंब न करता हे प्रकरण लवकर सोडवले तर बरे होईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री बदलतील की इतर कोणताही निर्णय होईल हे मला माहीत नाही. एकंदरीत, आम्ही हायकमांडला अंतिम निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्यांनी शक्य तितक्या लवकर सर्व काही ठीक होईल आणि केपीसीसी अध्यक्षपदाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.