Drug Trafficking Case | हाजगोळीतील एमडी ड्रग्ज प्रकरणी सहाजणांना अटक

एकजण बेळगाव येथील : केमिकल, साहित्य खरेदीबाबत कसून चौकशी
 drug trafficking case
एमडी ड्रग्जFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : हाजगोळी (ता. चंदगड) येथील एमडी ड्रग्ज कारखानाप्रकरणी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने ६ जणांना अटक केली. त्यांना मंगळवारी विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना शुक्रवार (दि. २८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयितांनी टू ब्रोमो सह इतर केमिकल व उपकरणे कुठून खरेदी केली याची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी काजू व्यावसायिकाचीही चौकशी सुरू आहे.

मोहम्मद जाफर अली मेमन ( ४०), शोएब शरीफ खान उर्फ नेपाळी (३१, दोघेही रा. माहिम, मुंबई), तौसीफ अब्दुल सत्तार कलानिया (३५, रा. कुर्ला, मुंबई), संतोष सदानंद बसरकट्टी (३०, रा. तुडिये चंदगड), पप्पू विठ्ठल मालतवाडकर (३६ रा. सारोळी चंदगड), मतीन मेहबूब डफेदार (३०, रा. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पथकाचा सलग सहा दिवस प्रवास

पोलिस अधीक्षक महंमद मकानदार, अपर पोलीस अधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने बुधवारी (दि. १९) मुंबई येथून इरफानला अटक करून थेट चंदगड गाठले, सहाजणांना अटक करून पुणे गाठले. मंगळवारी दिवसभर त्यांच्याकडे कारखान्यासाठी लागणारे केमिकल, उपकरणे याची खरेदी कुठून केली याबाबत कसून चौकशी सुरू आहे.

काजू व्यावसायिकाची चौकशी

संशयित संतोषने सर्व केमिकल व साहित्य चंदगड येथील एका काजू व्यावसायिकाच्या फॅक्टरीमध्ये ठेवले होते. त्याच्याकडेही पोलीस चौकशी करत आहेत. संतोष व त्या काजू व्यावसायिकाच्या फोन डिटेल्सची पडताळणी सुरू असून, लवकरच त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे.

मतीन, तौसिफ मुख्य गुंतवणूकदार

बेळगांव येथील मतीन, मुंबईतील ड्रग्ज पेड्लर तौसिफ हे नातेवाईक आहेत. ते दोघे या कारखान्यातील मुख्य गुंतवणूकदार असल्याची माहिती समोर आली आहे. संतोषला केवळ परिसरात दहशत ठेवण्यासाठी सहभागी करुन घेतले होते. तर पप्पूला पोल्ट्रीसाठी महिना ५० हजार तर धंदा वाढल्यानंतर महिन्यास १ लाख रुपये देण्याचे ठरले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news