Maternal death: सिंदगी रुग्णालयात प्रसूतीनंतर बाळंतीण, अर्भकाचा मृत्यू

डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा कुटुंबियांचा आरोप
Maternal death
Maternal death: सिंदगी रुग्णालयात प्रसूतीनंतर बाळंतीण, अर्भकाचा मृत्यूPudhari
Published on
Updated on

विजापूर : प्रसूतीनंतर बाळंतीण आणि अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी सरकारी रुग्णालयात घडली. मैत्रा रविचंद्र सुंगठाण (वय 26, रा. विद्यानगर सिंदगी) असे मृत महिलेचे नाव आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मैत्रा हिला 18 फेब्रुवारी रोजी सिंदगी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिने बाळाला जन्म दिला. मात्र, अतिरक्तस्राव होत असतानाही डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीय आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच आपली मुलगी व बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेची आई शीतम्मा यांनी केला आहे. याप्रकरणी सिंदगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यासंदर्भात जिल्हा आरसीएचओ डॉ. परशुराम हिटनाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रुग्णालयात त्यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. वेदना वाढल्यामुळे स्टाफ नर्स यांनी प्रसूती केली. त्यावेळी तीव्र रक्तस्राव झाला. पुढील उपचारासाठी विजापूर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, रक्तस्राव अधिक झाल्याने आई व बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेबाबत वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news