

बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेंतर्गत वीज बिल मोफतअसताना हेस्कॉमकडून चक्क 13 हजार रूपये बिल आहे. त्यामुळे संबंधित घरमालकाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. किल्ला येथील रहिवासी संतोष दिवटे यांना सप्टेेंबर महिन्याचे बिल 13,628 रुपये आले आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत दिवटे यांना मोफत वीज मिळत असल्याने एवढे बिल आले कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हेस्कॉमच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
वाढीव आलेले बिल कमी करण्यासाठी दिवटे यांना हेस्कॉम कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागत आहे. यासंदर्भात त्यांनी हेस्कॉमशी संपर्क साधला असता वीज मीटरमध्ये बिघाड असल्यास अशी समस्या निर्माण होते, अशी माहिती देण्यात आली. मीटर रिडिंगचा 10 सेंकदाचा व्हिडिओ तसेच गत महिन्यातील बिल भरलेली पावती आणि सध्याचे बिल सोबत आणण्यास हेस्कॉमने त्यांना सांगितले आहे. वीज मीटरमध्ये बिघाड असेल तर नवीन मीटरसाठी 250 रुपये शुल्क भरल्यानंतर सुधाजरत वीजबिल येईल, अशी माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दिवटे यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.