Shivam Associates fraud case: नीलण्णावरचा दरबार पुणे, नाशिमध्येही

सीआयडी पथकाकडून लिंकचा शोध सुरु : पाच कार जप्त, स्थावर मालमत्तेचा शोध घेणार
शिवानंद नीलण्णावर
शिवानंद नीलण्णावरPudhari
Published on
Updated on

बेळगाव : शिवम असोसिएट्सचा संचालक शिवानंद नीलण्णावर याची चौकशी व तपास हा कर्नाटकातील गुंतवणुकीबाबतचा आहे. परंतु, त्याने महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारासह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात दहा हजारांवर गुंतवणूकदार असल्याचा संशय असून पोलिसांचा तपास आता त्या दिशेने सुरु होण्याची शक्यता आहे.

शिवम असोसिएट्सने नेमकी किती गुंतवणूक करुन घेतली आहे, याची आकडेवारी अद्यापही स्पष्ट झालेली नाही. परंतु, त्याने महाराष्ट्रातूनही आपल्या कंपनीत मोठी गुंतवणूक करून घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, हा आंतरराज्य गैरव्यवहार असल्याचे सीआयडीचे म्हणणे असून त्या दिशेने तपास होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दरबार

नीलण्णावरने गुंतवणूक घेताना सर्वाधिक रक्कम ही निवृत्त लष्करी जवानांकडून घेतल्याचे बोलले जात आहे. त्याने घेतलेल्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक माजी सैनिकांची आहे. नाशिक जिल्ह्यात वेगवेगळे लष्करी तळ असून यामधील हजारो निवृत्त तसेच कार्यरत जवानांनी मोठी गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. सुमारे १० हजाराहून अधिक गुंतवणूकदार या एका जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते.

पुण्यात मेळावा, अनेकांना कार भेट

काही महिन्यांपूर्वी नीलण्णावरने पुण्यात मोठा मेळावा घेतला होता. या मेळाव्याला हजारो गुंतवणूकदार उपस्थित असल्याचे सांगितले जाते. नीलण्णावर गेल्या दहा वर्षांपासून म्हणजे २०१६ पासून गुंतवणूक करुन घेतो. सुरवातीच्या गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम स्वतः गुंतवली आहे, शिवाय अनेकांना गुंतवणूक करण्यास परावृत्त केले आहे. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आल्याने पाच ते अकरा जणांची निवड करुन त्यांना प्रत्येकी ६० लाखांची व्होल्वो कार भेट दिल्याचीही चर्चा आता सुरु आहे. अशीच कार येथील नीलण्णावरचा समर्थक आर. अभिलाष याला दिली होती. ती कार पोलिसांनी जप्त केली आहे. यावरुन आता सीआयडी पथक महाराष्ट्रातही तपासासाठी जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news