Shivam Associates fraud case: नीलण्णावरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

छातीत दुखत असल्याची तक्रार : आवश्यक उपचारांचे न्यायालयाचे निर्देश
Shivam Associates fraud case: नीलण्णावरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Published on
Updated on

बेळगाव : शिवम असोसिएट्सच्या बहुचर्चित ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित शिवानंद नीलण्णावरला बुधवारी (दि. २७) दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. सुनावणीनंतर न्या. गंगाधर के. यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले.

प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असून अनेक महत्त्वाच्या बाबींची छाननी सुरु आहे. तपास प्रक्रियेसाठी संशयिताचे सहकार्य आवश्यक असल्याने आहे. पुढील तपासासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून संशयिताला पोलिस कोठडी देण्याची मागणी सीआयडीने केली. परंतु, न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देत संशयिताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे, पुढील सुनावणीपर्यंत नीलण्णावरचा मुक्काम हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात राहणार आहे.

सुनावणीवेळी नीलण्णावरने छातीत दुखत असल्याची तसेच इतर आरोग्य समस्या असल्याची माहिती न्यायालयाला दिली. यावर न्यायालयाने कारागृह प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय तपासणी करुन योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या. गरज भासल्यास शासकीय रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. अधिक उपचारांची आवश्यकता असल्यास वकिलामार्फत रीतसर अर्ज सादर करावा.. कारागृहात प्रकृती बिघडल्यास तातडीने वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news