‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष

Shivaji Jayanti: शहर परिसरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात; शिवविचारांचा जागर
Shiv Jayanti celebration
बेळगाव : शिवाजी उद्यानातील शिवपुतळ्याला अभिवादनप्रसंगी रमाकांत कोंडुसकर, माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, अंकुश केसरकर आदी.pudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत मंगळवारी (दि. 29) शहर परिसरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती मंडळातर्फे नरगुंदकर भावे चौक व शिवाजी उद्यानात शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

नरगुंदकर भावे चौक येथील शिवपुतळ्याचे आरती, पूजन झाल्यानंतर शिवाजी उद्यानातील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी शिवरायांच्या विचारांना उजाळा दिला. श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, रणजित चव्हाण-पाटील, रमेश पावले, शुभम शेळके, मदन बामणे, महादेव पाटील, गणेश दड्डीकर, अकुंश केसरकर, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते.

शहर, उपनगरात विविध तरुण मंडळांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करुन जयघोष करण्यात आला. सोशल मीडियावर शिवजयंतीनिमित्त संदेश आणि शुभेच्छांची देवाणघेवाण दिवसभर सुरु होती.

राजहंसगड किल्ल्यासह महाराष्ट्रातील रायगड, कलानिधीगड, महिपाळगड, यशवंतगड, लोहगड, पारगड, सामानगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग आदी गडकिल्ल्यांवरून आणलेल्या 30 शिवज्योतींचे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे आगमन झाले.

शिवज्योत आणणार्‍या मंडळांमध्ये राजारामनगर उद्यमबाग, छत्रपती शिवाजी युवक मंडळ कल्लेहोळ, शिवज्योत हिंडलगा रामदेव गल्ली, गणेश युवक मंडळ गणेश पेठ जुने बेळगाव, शिवजयंती उत्सव मंडळ अनंतशयन गल्ली, शिवजयंती उत्सव मंडळ आनंदवाडी, बालशिवाजी युवक मंडळ मेणसे गल्ली, स्वराज्य युवक मंडळ मजगाव, वायुपुत्र सेना मंडळ नवी गल्ली शहापूर, ओमकार तरुण मित्र मंडळ पवार गल्ली शहापूर, एकता युवक मंडळ हट्टीहोळ गल्ली शहापूर, शिवशक्ती युवक मंडळ शास्त्रीनगर, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कोरे गल्ली, ब्रम्हलिंग युवक मंडळ गंगानगर गणेशपूर, छत्रपती शिवाजी महाराज युवक प्रतिष्ठान लक्ष्मीनगर हिंडलगा, बाल शिवाजी युवक मंडळ लोहार गल्ली अनगोळ आदींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news