

बंगळुर : बंगळुर येथे आयोजित १६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र आणि १० लाखांचा धनादेश देऊन आझमी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थित होते. शासनाचे अप्पर मुख्य सचिव एल. के. अतीक, माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर, चित्रपट अकादमीचे अध्यक्ष साधू कोकिल, सचिव कावेरी, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर, १६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कला दिग्दर्शक विद्याशंकर उपस्थित होते.