बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा देवी डोंगरावरील देणगी पेटीतील रक्कम नुकतीच मोजण्यात आली. २५ मे ते २० जुलै या ५५ दिवसांत दानपेटीत १ कोटी ४८ लाख ९५ हजार ४०४ रुपये देणगी जमा झाली आहे. यामध्ये १ कोटी ३५ लाख रोख रक्कम असून ११ लाख ७९ हजारांचे सोन्याचे, तर १ लाख ८० हजारांच्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
देणगी पेटीतील रकमेची तब्बल तीन दिवस मोजणी सुरू होती. यावेळी सौंदत्ती देवस्थान समितीचे अध्यक्ष व सदस्य, देवस्थान कार्यकारी समितीचे अधिकारी, धर्मादाय खात्याचे सहायक आयुक्त, सौंदत्ती तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, सौंदत्ती ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्यासमोर ही मोजदाद करण्यात आली. यल्लम्मा देवस्थानचे कार्यकारी अधिकारी एस. पी. बी. महेश, वाय. वाय. काळप्पन्नवर, कोळप्पगौडा गंदिगवाड, लक्ष्मी हुली, नागरत्ना चोळीन, वाळे अब्बाई एम. एस. यलीगार, एम. पी. द्यामनगौडा, डी. आर. चव्हाण, अल्लमप्रभू प्रभुन्नवर, सी. एस. कुलकर्णी, आनंद गोरवनकोळ्ळ, डी. डी. नागनगौडा यांच्यासह सिंडीकेट बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यल्लम्मादेवीच्या दानपेटीत यावेळी चांगली रक्कम व दागिने आलेले आहेत. मंदिराला येणाऱ्या भक्तांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी या रकमेचाही निश्चितच हातभार लागणार आहे.
विश्वास वैद्य, आमदार, सौंदत्ती