Belgaum bike theft case: दोघांनी चोरल्या 27 दुचाकी

बेळगाव, चंदगड तालुक्यात कारनामे; संकेश्वर पोलिसांकडून जेरबंद
Belgaum bike theft case
Belgaum bike theft casePudhari
Published on
Updated on

बेळगाव/संकेश्वर : दोघा चोरट्यांनी तब्बल 27 दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले असून, त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. दुचाकींची एकूण किंमत 18 लाख 30 हजार रूपये असून, या चोरट्यांनी बेळगाव, चंदगड आणि बैलहोंगल तालुक्यात हे कारनामे केले आहेत. संकेश्वर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

लक्ष्मण विरूपाक्षी कणबरगी (वय 31, रा. अंकलगी, ता. गोकाक, सध्या रा. समर्थनगर, बेळगाव) व फकीराप्पा सिद्धाप्पा करीगार (25, रा. हिरेहट्टी, ता. गोकाक, सध्या रा. बोळकडबी, ता. यरगट्टी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

उपरोक्त दोघा संशयितांना 2 एप्रिलरोजी गस्तीवर असलेल्या संकेश्वर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते दुचाकीचोर असल्याचे आढळून आले. या दोघांनी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथे तसेच बेळगाव शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरल्याचे आढळून आले. त्यांनी हिरेबागेवाडी, एपीएमसी, शहापूर, माळमारुती, मार्केट, काकती, खडेबाजार, वडगाव, टिळकवाडी तसेच महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातूनही दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.

चोरट्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे तब्बल 27 दुचाकी आढळून आल्या. यामध्ये स्प्लेंडर प्लस, बजाज डिस्कव्हर, पल्सर, यासह अन्य विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे. चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. संकेश्वरचे पोलिस निरीक्षक एस. एम. अवजी, उपनिरीक्षक यु. एस. शेट्टन्नवर, विठ्ठल नाईक, सहायक उपनिरीक्षक, एल. एस. खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news