Karnataka Legislative Council Election : ३-१ वरून ४-०; विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-निजद युतीची चारही जागांवर बाजी

काँग्रेसला एका जागेचे नुकसान
Elections
Elections
Published on: 
Updated on: 

बंगळूर : प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजप-निजद युतीने चारही जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला आहे. तीन मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर बंगळूर शिक्षक मतदारसंघात धजद उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराची सत्ता संपुष्टात आणली. या चार जागांपैकी तीन जागा भाजपकडेच होत्या. आता चारही जागा भाजप-निजद युतीकडे गेल्या असून काँग्रेसला एका जागेचे नुकसान झाले आहे.

पश्चिम पदवीधर मतदारसंघात एस. व्ही. संकनूर यांनी काँग्रेसचे मोहन लिंबेकाई यांचा ६,७३८ मतांनी पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे ७,९०२ म्हणजेच विजयाच्या फरकापेक्षा अधिक मते अवैध ठरली आहेत. बंगळूर शिक्षक मतदारसंघात निजदचे ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे पाचवेळचे आमदार पुट्टण्णा यांचा ९०२ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे या मतदारसंघातही १,८५७ मते अवैध ठरली. ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे शशील नमोशी पाचव्यांदा निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या शरणाप्पा मट्टूर यांचा ३,९९७ मतांनी पराभव केला. आग्नेय पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार के. एम. सुरेश यांनी काँग्रेसचे शशी हुलिकुंटेमठ यांना तब्बल २३,०९८ मतांनी पराभूत केले.

विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. काँग्रेसने चारही जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपने तीन मतदारसंघांत आणि निजदने एका मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. दोन्ही पक्षांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता. चारही मतदारसंघांत भाजप-धजद आघाडीला विजय मिळाला आहे. विजयाच्या घोषणेनंतर बुधवारी बंगळूर भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा केला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी, सुनीलकुमार आदी नेते जल्लोषात सहभागी झाले होते.

आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढल्यास १६० पेक्षा अधिक जागा भाजप-निजद युतीला जिंकता येतील, असा संदेश या निकालाने दिला असल्याचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news