Sambra Airport : सांबरा विमानतळावरील सेवा वाढविणार

स्टार, इंडिगो विमान कंपन्यांची ग्वाही; खासदारांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक
sambra-airport-services-to-be-expanded
सांबरा : बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार जगदीश शेट्टर. शेजारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, त्यागराजन आदी.Pudhari File Photo
Published on
Updated on

बेळगाव : भविष्यात सांबरा विमानतळावरील सेवेत वाढ करणार असून विविध शहरांना विमानसेवा पुरविण्यात येईल, अशी ग्वाही इंडिगो आणि स्टार एअरच्या कंपन्यांनी दिली. त्यामुळे, येत्या काळात बेळगावची कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सांबरा विमानतळाच्या विकासाबाबत गुरुवारी (दि. 29) खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत महसूल विभाग, भारतीय हवाई दल, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यावेळी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बेळगाव शहराचा विकास वेगाने होत आहे. देशातील विविध शहरांना विमानसेवा उपलब्ध करुन देण्याची प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. यासंदर्भात खासदार शेट्टर यांनी इंडिगो आणि स्टार एअरच्या अधिकार्‍यांना त्यांची कंपनी कोणत्या शहरांना विमान सेवा देऊ शकते याबद्दल विचारणा केली. भविष्यात प्रथम पुणे शहराला विमानसेवा सुरु केली जाईल. त्यानंतर जोधपूर, अजमेर आणि चेन्नईसारख्या अत्यंत मागणी असलेल्या शहरांना देखील विमानसेवा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उभय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिले.

बेळगाव विमानतळाचे रुपांतर आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतर करण्याबाबतही चर्चा झाली. सांबरा विमानतळावर येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रहदारी कोंडी टाळण्यासाठी बेळगाव-सांबरा रस्त्याचे जलदगतीने चौपदरीकरण करणार असल्याचे सांगितले. बैठकीला प्रांताधिकारी श्रवण नायक, विमानतळाचे संचालक त्यागराजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टर्मिनल इमारतकामाचा आढावा

खासदार शेट्टर यांनी विमानतळ विकासाचा एक भाग असलेल्या टर्मिनल इमारतीचा आढावा घेतला आणि कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. हे काम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर प्रवाशांना देशातील विविध शहरांमध्ये अधिक विमान सेवांची सुविधा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news