

बंगळूर : आरटीई अंतर्गंत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशासाठी शालेय शिक्षण खात्यातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पालकांना 21 एप्रिल ते 17 मेपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.
जवळच्या शाळेची अंतिम यादी, एलकेजी आणि पहिली प्रवेशासाठी विनाअनुदानित शाळांसाठी 25 टक्के जागा राखीव असणाऱ्या जागा, त्याचबरोबर अनुदानित शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या शाळानिहाय जागा यांची अधिकृत माहिती वेबसाईटवर 17 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 21 एप्रिल ते 17 मेपर्यंत शाळा प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अर्जांची छाननी 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत करण्यात येणार आहे. लॉटरी पद्धतीने पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी 22 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
ऑनलाईन लॉटरी पद्धतीने पहिल्या टप्प्यातील निवड 25 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 26 मे पासून 8 जूनपर्यंत शाळेतून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे. याचकालावधीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 12 जून रोजी दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 13 जून ते 19 पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया चालणार आहे.
एक नजर
- 17 एपिल : जागांची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध
- 21 एप्रिल ते 17 मे : प्रवेशासाठी अर्ज करण्यास संधी
- 22 एप्रिल ते 18 मे : अर्जांची छाननी
- 22 मे : पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर