Karnataka GST scam: भंगार खरेदीत ४१८ कोटींचा जीएसटी घोटाळा

जीएसटी वाणिज्य कर विभागाकडून दोन उद्योजकांना अटक
GST Fraud
GST FraudPudhari
Published on
Updated on

बंगळूर : भंगार वस्तूंच्या नावे २,३८४ कोटी रुपयांचे अवैध निधीचे व्यवहार करून राज्य सरकारची जीएसटी इनपूट टॅक्स क्रेडिटमध्ये (आयटीसी) ४१८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन उद्योजकांना राज्य वाणिज्य कर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. सलीमुल्लाह बेग (वय ४९) व हसन बेग (३५) अशी संशयितांची नावे आहेत.

शहरातील नयंडहल्ली परिसरात नोंदणीकृत असलेल्या काही भंगार हाताळणाऱ्या कंपन्या वारंवार बनावट जीएसटी पावत्या तयार करून आयटीसीची फसवणूक करत होत्या. यासंदर्भात तपास हाती घेतला असता येथील एसकेएस ट्रेडर्सच्या नावाने भंगार वस्तूंची कंपनी चालविणाऱ्या सलीमुल्लाह बेगने सुमारे ७२ बनावट कंपन्यांसोबत संशयास्पद व्यवहार केल्याचे आढळले.

या माध्यमातून २,१७२ कोटी रुपयांचा टंगस्टन कार्बाईड कचरा, ई-कचरा व काही इतर खराब झालेली यंत्रसामग्री खरेदी केल्याची बिले एसकेएस ट्रेडर्सने तयार केली आहेत. मात्र, या ७२ कंपन्या अस्तित्वात नाहीत. तसेच २,१७२ कोटींच्या बनावट व्यवहारातून एसकेएस ट्रेडर्सच्या नावे ३८० कोटींचे आयटीसी मिळवण्यात आले आहे.

याप्रमाणे हसन बेग याच्या मालकीच्या 'केएच ई-वेस्ट रिसायक्लर'ने ५५ बनावट कंपन्यांसोबत २१२ कोटींच्या संशयास्पद व्यवहारांमधून ३८ कोटींचे आयटीसी मिळवल्याचे उघड झाले आहे. हे प्रकरण सलीमुल्लाह बेग व हसन बेग हे दोघे संभाळत असल्याचे कळते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news