Belgaum Fraud Case: निवृत्त पीएसआयची साडेदहा लाखांची फसवणूक

वर्षात चौपट लाभाचे आमिष : मंड्यातील कंपनीसह चौघांवर गुन्हा
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

बेळगाव : वर्षात तब्बल चौपट परतावा देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त उपनिरीक्षकाची साडेदहा लाखांची फसवणूक केली आहे. या उपनिरीक्षकाने शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहापूर पोलिसांनी कंपनीच्या प्रमुख महिलेसह चौघांविरोधात गुरुवारी (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

निवृत्त उपनिरीक्षक गुरुवय्या रामय्या गंटेण्णावर (रा. आदर्शनगर, सहावा क्रॉस वडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंड्या येथे युनिसिटी ईएसपीएन ग्लोबल सिंपल स्विफ्ट सेक्युअर नावाची कंपनी आहे. या कंपनीने गुरुवय्या यांना एका वर्षात गुंतवणुकीवर चौपट नफा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली. गुरुवय्या यांनी कंपनीवर विश्वास ठेवून तब्बल १० लाख ४६ हजार ८५० रुपयांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्यांनी काही रोखीने तर काही बँक खात्याद्वारे पाठवली.

परंतु, कंपनीने कसलाही लाभांश न देता फसवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या संस्थापक संचालक ज्योती एम. एस., एम. शिवराम, सुमंग गंगडकर व बी. के. चन्नगौडा (सर्वजण रा. करेगोडू, जि. मंड्या) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news