IPS Dr.Ravindranath: निवृत्त आयपीएस डॉ. रविंद्रनाथ आता आरोग्यसेवेत

बंगळूरमध्ये क्लिनिक सुरु करुन मोफत सेवा
IPS Dr.Ravindranath
IPS Dr.RavindranathPudhari
Published on
Updated on

बंगळूर : राज्य पोलिस दलात विविध पदांवर कार्यरत असताना वेगवेगळ्या कारणांमुळे राजीनामा दिल्याने चर्चेत राहिलेले आयपीएस अधिकारी डॉ. पी. रवींद्रनाथ आता पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आता आरोग्यसेवेत कार्यरत असून असून मोफत सेवा देत आहेत.

बंगळूरमधील एचएसआर लेआऊटमध्ये ‌‘डॉ. रवींद्रनाथ हेल्थकेअर‌’ सुरु करुन डॉ. रवींद्रनाथ रुग्णांना सकाळी 10 ते दुपारी 1 व सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत मोफत सेवा देत आहेत. एमबीबीएस पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. कर्नाटक केडरचे अधिकारी म्हणून राज्यात सेवा बजावली. पोलिस दलात एसपी, डीआयजीपी, आयजीपी, एडीजीपी व अखेरीस डीजीपी यांसह विविध पदांवर काम करताना त्यांनी चारवेळा राजीनामा दिला होता. त्यामुळे, वाद निर्माण झाला होता. शेवटी नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकपदावरुन पोलिस प्रशिक्षण विभागात बदली झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

परंतु, त्यांची समजूत घालून त्यांना पुन्हा पदावर रुजू करण्यात आले. यापूर्वी 2013-14 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. कनिंगहॅम रोडवरील एका कॉफी सेंटरमध्ये झालेल्या फोटोशूटच्या वाद प्रकरणी त्यांना चौकशीसाठी हाय ग्राउंड्स उपनिरीक्षक ठाण्यात नेण्यात आले होते. तसेच रवींद्रनाथ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बंगळूर पोलिस आयुक्त राघवेंद्र औरादकर व तत्कालीन गुप्तचर विभागाचे आयजीपी आयएनएस प्रसाद यांच्यावर जातीय अपमानाचा आरोप केला होता. त्यावेळीही राजीनामा दिल्याने ते चर्चेत आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news