करोशी येथील नकली दवाखान्यावर छापा

छाप्यामध्ये औषध साठा, वैद्यकीय साहित्य जप्त
raid on a fake hospital in Karoshi
करोशी येथील नकली दवाखान्यावर छापा टाकला.Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

चिकोडी : तालुक्यातील करोशी येथील साई क्लिनिक या नकली दवाखान्यावर छापा टाकला. या छाप्यामधून दवाखान्यातील औषधे जप्त करण्यात आली आहे. हि घटना गुरूवारी (दि.२८) रोजी घडली आहे.

त्याबाबत अधिक माहिती अशी की, करोशी येथील साई क्लिनिक नावाचा बेकायदेशीरीत्या दवाखाना सुरू असल्याची तक्रार दिली होती. हि तक्रार दोन दिवसांपूर्वी चिकोडी येथे झालेल्या जनस्पंदन कार्यक्रमात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना दिली होती. त्यांच्या सूचनेनुसार चिकोडी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. गडद, तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार बागाई व तालुका कार्यकारी अधिकारी एस. एस. काद्रोळी यांच्या पथकाने करोशी येथील प्रकाश केंगारे या नकली डॉक्टरांच्या दवाखान्यावर धाड टाकली.

सुरुवातीला नकली डॉक्टर केंगारे याला हजर राहण्यास सांगितले होते. पण केंगारे हा हजर न झाल्याने त्याच्या करोशी येथील दवाखान्यावर धाड टाकली. धाड टाकतेवेळी दवाखाना बंद असल्याने कुलूप तोडून अधिकाऱ्यांनी आत प्रवेश केला. दवाखान्यातील औषध साठा, वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी घटनेचा विडीओ करून दवाखाना सील करण्यात आला.

याविषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुकुमार बागाई बोलताना म्हणाले, जनस्वंदन कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे या बनावट डॉक्टर विरोध तक्रार करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनानुसार ही कारवाई करण्यात आली असून प्रकाश केंगारे यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसून बेकादेशीर रित्या वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी व समितीसमोर सदर रिपोर्ट सादर केला जाईल त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे सुकुमार बागाई यांनी सांगितले. यावेळी चिकोडी पीएसआय बसगौडा नेरली, पीडीओ तनवीर नाईकवाडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली असून परिसरातील अनेक खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news