QR Code Scam | अनोळखी ‘क्यूआर कोड’ स्कॅन महागात; भाजी व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा

QR code scam
QR code scamfile photo
Published on
Updated on

बेळगाव : कुटुंबाला गावी ऑनलाईन पैसे पाठवायचे आहेत, तुम्हाला मी पाच हजार रुपये रोख देतो, तुम्ही माझा क्यूआर कोड स्कॅन करून रक्कम पाठवा, असे म्हणत रक्कम पाठवली. परंतु, तासाने एक एपीके फाईल आली व त्याद्वारे टप्प्याटप्प्याने ४ लाख ६९ हजार रुपये बँक खात्यातून परस्पर काढून घेण्यात आल्याचा प्रकार काकतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसलेल्या भाजी विक्रेत्याने सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, काकतीतील मरगाई गल्लीतील भाजी व्यापारी कृष्णा यांच्याकडे ५ एप्रिल रोजी एक अनोळखी इसम आला. त्याने कृष्णा यांना सांगितले की, मला कुटुंबाला गावी ऑनलाईन पैसे पाठवायचे आहेत. तुम्हाला मी पाच हजार रुपयांची रोख रक्कम देतो. त्या बदल्यात माझ्या क्यूआर कोडवर ऑनलाईन रक्कम पाठवा, असे त्याने सांगितले. त्यानुसार कृष्णा यांनी याचदिवशी त्या अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरील क्यूआर कोड स्कॅन करून त्यावर पाच हजारांची रक्कम पाठवली.

कृष्णा यांनी ही रक्कम पाठवल्यानंतर एका तासाने त्यांच्या मोबाईलवर आरटीओ चलन म्हणून एक एपीके फाईल आली. त्यावर क्लिक करताच त्यांचा मोबाईल बंद झाला. पुन्हा सुरू झाला, तरी तो हॅक झाल्याचे लक्षात आले. यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावरील ४ लाख ६९ हजारांची रक्कम अन्यत्र वर्ग झाली. ५ ते ६ एप्रिलदरम्यान हा प्रकार घडला. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी शहर सीईएन ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news