

बेळगाव : कोल्हापूर आणि सांगलीतील तुफान प्रतिसादानंतर आता बेळगावकर पर्यटकांना देश-विदेशातील पर्यटनस्थळांची माहिती एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६’ सज्ज झाले असून, या प्रदर्शनाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पर्यटन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ‘गगन टूर्स’ प्रस्तुत ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६’ पॉवर्ड बाय ‘अ हेवन हॉलिडे’चे आयोजन शुक्रवार (दि. २१ ऑगस्ट) पासून तीन दिवस मराठा मंदिर, खानापूर रोड येथे करण्यात आले आहे.
‘नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास’ असा मंत्र जपत देश-विदेशातील स्वप्नवत पर्यटनस्थळांची सैर करण्याची, प्रवासाचे अचूक नियोजन करण्याची आणि पर्यटनावर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सचा ‘ऑन द स्पॉट’ अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. पुढील स्वप्नवत सहलींचे उत्तम व बजेटमध्ये नियोजन करण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व नागरिक व पर्यटनप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे.
प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये व आकर्षणे :
एकाच छताखाली संपूर्ण माहिती : देश-विदेशातील नामांकित आणि विश्वासू ट्रॅव्हल एजन्सींचे प्रतिनिधी थेट उपलब्ध.
विविध डेस्टिनेशन्स : काश्मीर, हिमाचल, केरळम् यांसारख्या देशांतर्गत पर्यटनस्थळांपासून ते युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया, दुबई यांसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची परिपूर्ण माहिती.
खास पॅकेजेस व बंपर सवलती : कौटुंबिक सहली, सिनियर सिटीझन्स स्पेशल टूर्स, हनिमून पॅकेजेसवर विशेष सवलती, फायनान्स सुविधा आणि आकर्षक ‘ऑन-द-स्पॉट’ बुकिंग डिस्काऊंट्स.
तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन : बजेटनुसार सहल कस्टमाईज करणे आणि टूर प्लॅनिंगसाठी ट्रॅव्हल तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन.
‘पुढारी न्यूज’, ‘पुढारी ऑनलाईन’, ‘टोमॅटो एफएम’ आणि ‘टोमॅटो ब्रिगेड’ यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट पर्यटन क्षेत्रात अत्यंत विश्वासार्ह ठरला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८१४९५८२४४२.
प्रदर्शन दिनांक व स्थळ
दिनांक : २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ८.०० पर्यंत
स्थळ : मराठा मंदिर,
खानापूर रोड, बेळगाव