Pudhari Tours and Travels Exhibition: जग भटकंतीचे स्‍वप्‍न साकारणारे प्रदर्शन

'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स' प्रदर्शनाला दिमाखात प्रारंभ : पहिल्‍याच दिवशी पर्यटकांचा प्रतिसाद
Pudhari Tours and Travels Exhibition
बेळगाव : दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना आमदार अभय पाटील. शेजारी अविनाश पोतदार, बाळाराम पाटील, ॲड. बी. जे. गंगाई, विलास बेळगावकर, योगेश सोनटक्‍के, प्रणिती बुगडे, डी. बी. पाटील, संजय मोरे, शशिकांत पवार, गोपाळ गावडा व संजय सूर्यवंशी.
Published on
Updated on

​बेळगाव : पर्यटक आणि पर्यटनातून राज्य चालवता येते, हे आपल्याला गोव्याने दाखवून दिले आहे. ३०-४० वर्षांपूर्वी धार्मिक पर्यटन जास्त चालत असे. सध्‍या वेगवेगळ्या दृष्टीने पर्यटन बदलले आहे. एक तर जग वाचून बघता येते किंवा फिरुन बघता येते. आता बेळगावकरांचे जग भटकंतीचे स्‍वप्‍न पर्यटन प्रदर्शनातून साकार होऊ शकते, असे मत आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केले.

'गगन टूर्स' प्रस्तुत 'पुढारी टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६' पॉवर्ड बाय 'अ हेवन हॉलिडे'चे उद्‌घाटन शुक्रवारी (दि. २१) मराठा मंदिरमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते. २१ ते २३ ऑगस्‍ट दरम्‍यान होणाऱ्या या तीन दिवसीय प्रदर्शनात पहिल्‍याच दिवशी पर्यटकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्‍य प्रायोजक गगन टूर्सचे योगेश सोनटक्‍के, अ हेवन हॉलिडेच्‍या प्रणिती बुगडे, रोटरी क्‍लबचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, मध्‍यवर्ती म. ए. समितीचे अध्‍यक्ष प्रकाश मरगाळे, मराठा बँकेचे अध्यक्ष बाळाराम पाटील, बेळगाव बार असोसिएशनचे अध्‍यक्ष ॲड. बी. जे. गंगाई, समिती नेते विलास बेळगावकर, डी. बी. पाटील, यश ऑटोचे संजय मोरे व्यासपीठावर होते.

आमदार पाटील पुढे म्‍हणाले, पुढारीने पर्यटन प्रदर्शन भरवून बेळगावमधील लोकांना नवीन विचार देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. पर्यटन वाढले की पर्यटक वाढतात. पर्यायाने त्या भागातले उद्योगही वाढतात. त्यामुळे या पर्यटन प्रदर्शनाचा बेळगावकरांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन केले.

अविनाश पोतदार म्हणाले, पर्यटन कंपन्‍यांमुळे जगभर प्रवास करणे सोपे झाले आहे. धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढून कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी आनंद लुटू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी आहे, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी आमदार पाटील व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फीत कापून प्रवेशद्वाराचे उद्‌घाटन केले. यानंतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करुन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. पुढारीचे विभागीय जाहिरात व्‍यवस्‍थापक शशिकांत पवार, निवासी संपादक गोपाळ गावडा, वृत्तसंपादक संजय सूर्यवंशी, साहाय्यक व्‍यवस्‍थापक विनायक धामणेकर यांनी मान्‍यवरांचे रोपटे देऊन स्‍वागत केले. वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

विविध पॅकेजेस उपलब्ध

कौटुंबिक सहली, हनिमून पॅकेजेस, सोलो टुरिस्ट दुर्मी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष यात्रा अशा सर्व प्रकारच्या सहलींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे. आवडीनुसार आणि बजेटनुसार सहलीचे नियोजन येथे करता येईल. 'फनसाईट' जल पर्यटनासाठी बॅकवॉटरचा आनंद आणि वेगवेगळ्या पॅकेजेसवर सवलती मिळणार आहेत. पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.

​प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये व आकर्षणे

एकाच छताखाली संपूर्ण माहिती : देश-विदेशातील नामांकित आणि विश्वासू ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी थेट उपलब्ध.

विविध डेस्टिनेशन्स : काश्मीर, हिमाचल, केरळसारख्या अंतर्गत पर्यटनस्थळांपासून ते युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया, दुबई यांसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची परिपूर्ण माहिती.

खास पॅकेजेस व बंपर सवलती : कौटुंबिक सहली, सिनियर सिटीझन्स स्पेशल टूर्स, हनिमून पॅकेजेसवर विशेष सवलती, फायनान्स सुविधा आणि आकर्षक 'ऑन-दी-स्पॉट' बुकिंग सवलती.

तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन : बजेटनुसार सहल कस्टमाईज करणे आणि टूर प्लॅनिंगसाठी ट्रॅव्हल तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन. ​'पुढारी न्यूज', 'पुढारी ऑनलाईन', 'टोमॅटो एफएम' आणि 'टोमॅटो ब्रिगेड' यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट पर्यटन क्षेत्रात अत्यंत विश्वासार्ह ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news