

Karnataka HESCOM Maintenance
निपाणी : निपाणी परिसरासह खडकलाट व बेनाडी येथील विद्युत पुरवठा केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीसह केंद्राच्या परिघामध्ये मार्ग ग्राउंड वायर स्ट्रिंग कटिंग व ३ ठिकाणी टॉवर रिपेअरी करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ३) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत वरील विभागासह गावातील वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉमचे मुख्य अभियंता सुरेश तहसीलदार व शहर अभियंता अक्षय चौगुला यांनी दिली.
शनिवारी खडकलाट व निपाणी येथील ११० केव्ही वीजपुरवठा केंद्रातून होणारा ३३ केव्ही-१ मॅग्नम टफ, फेस २ बेनाडी तसेच ११ केव्ही मधून होणारा वीजपुरवठा शहरासह ग्रामीण भागात दुपारी ३ पर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार आहे. तरी शेतकरी, ग्राहकांनी व सार्वजनिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.