आषाढी वारीसाठी पंढरपूर रेल्वे सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूर रेल्वे सुरू
Pandharpur Railway
आषाढी वारीसाठी पंढरपूर रेल्वे सुरू file photo

बेळगाव : पंढरपूरसाठी नवी रेल्वे सुरू करावी तसेच यशवंतपूर-पंढरपूर रेल्वेसेवा रोज चालू ठेवावी, अशी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत ३० जूनपर्यंत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे.

बंगळूर-पंढरपूर, हुबळी-पंढरपूर ही रेल्वेसेवा दि. २६ पासून सुरू झाली आहे. दि. ३० पर्यंत ही रेल्वे सुरु राहणार असून बेळगाव व खानापूरातील वारकरींना याचा लाभ होणार आहे.

रेल्वे नं (०६५०१) या क्रमांकाची बंगळूर ते पंढरपूर रेल्वे दि. २८ रोजी बंगळूरातून सायंकाळी दिवशी (दि.२९) पंढरपूरला सकाळी ११.३५ वा. पोहचणार आहे. रेल्वे नं. ०६५०५ ही रेल्वे दि. ३० जून रोजी रात्री १० वा. सुटणार असून दुसऱ्या दिवशी (दि.३०) पंढरपूरला सायंकाळी ४.३० वा. पोहचणार आहे. रेल्वे नं. ०६५०६ पंढरपूर येथून दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुटणार असून ती दुसऱ्या दिवशी दि. २ रोजी सकाळी ११.३० वा. पोहोचणार आहे.

ही रेल्वे तुमकूर, गुब्बी, निट्टर, बनसंदरा, तिपूर, अरसिकेरे, बिरुर, चिकजाजूर, दावणगेरी, हरिहर, राणेबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक, घटप्रभा, रायबाग, चिंचली, उगार खुर्द, मिरजया मार्गे धावत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news