कारला आग; तरुण ठार

चिकोडी-जैनापूरनजीक दुर्घटना; अपघात की घातपात ?
Car Burning At Chikkodi
जैनापूर : जळालेल्या कारची पाहणी करताना पोलिस अधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा

कारने अचानक पेट घेतल्याने झालेल्या दुर्घटनेत कारमधील तरुण ठार झाल्याची घटना चिकोडी शहराबाहेरील जैनापूरनजीक घडली. फैरोज बडगाव (वय 40) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात की घातपात, याबाबत दिवसभर चर्चा सुरू होती. चिकोडी शहरातील मुल्ला प्लॉट येथील फैरोज बडगाव यांचा ग्रॅनाईटचा व्यवसाय असून शहरात त्यांचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी बेळगावला कामानिमित्त जाऊन परत येत असताना रात्री एकच्या सुमारास जैनापूर गावच्या हद्दीतील विठ्ठल मंदिरानजीक त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. यात फैरोज भाजल्याने त्यांचा वाहनातच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिकोडी डीवायएसपी गोपाल कृष्ण, पीएसआय बसनगौडा नेर्ली यानीं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Car Burning At Chikkodi
Nagpur : नागपूरच्या तुकडोजी चौकात कारला आग

सुरुवातीला मृत व्यक्ती कोण, हे कळू शकले नाही. काही वेळात फैरोज बडगाव यांचे भाऊ व कुटुंबातील सदस्य घटनास्थळी आल्यानंतर वाहनाची ओळख पटली. फैरोज यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, वडील असा परिवार आहे. घटनास्थळी विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी भेट देऊन पोलिसांना धारेवर धरले. रस्त्यावर गाडीने पेट घेऊन ही दुर्घटना घडली असती, तर रस्त्यावरच वाहन उभे राहिले असते; पण मुख्य रस्त्यावरून कार सुमारे 200 मीटरपर्यंत आत गेल्याने घातपात असण्याची शक्यता असून सखोल तपासासाठी हे प्रकरण सीओडी किंवा सीबीआयकडे द्यावे, अशी सूचना डीवायएसपी गोपाल कृष्ण गौडर यांना केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news