Satish Jarkiholi | माझे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही: मंत्री सतीश जारकिहोळी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन अपप्रचारावर टीका
Satish Jarkiholi
Satish JarkiholiPudhari
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाबाबत माझे मत हायकमांडला कळविले आहे. त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. या पदावरुन माझ्याबद्दल शंभरवेळा अपप्रचार केला तरी मला काहीही फरक पडत नाही. माझे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री सतीश जारकिहोळी यांनी बुधवारी (दि. ३) बंगळूरमध्ये शपथविधीपूर्वी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाबाबतची माझी भूमिका आणि मत मी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तोच अंतिम असेल. राजकीय वर्तुळात आपल्या विरोधात तर्कवितर्क सुरु आहेत. अध्यक्षपदाबाबत अशा प्रकारचा शंभरवेळा खोटा प्रचार केला गेला, तरीही कुणी माझे काहीही बिघडवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news