Nipani Accident: निपाणीजवळ बसची ट्रकला धडक; चालक गंभीर

गतिरोधक न दिसल्याने अपघात ; चालक गंभीर;बसचा चक्काचूर
Nipani Accident
निपाणी : ट्रकच्या धडकेत बसचे झालेले नुकसान.Pudhari Photo
Published on
Updated on

निपाणी : पुढारी वृत्तसेवा शहराबाहेरील असलेल्या शिरगुपी रोड वळणावर सोमवारी मध्यरात्री बंगळूरूवरून मुंबईकडे जाणाऱ्या व्हीआरएल कंपनीच्या खासगी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली.यावेळी बसच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला.तर चालक यासिन सिराज मुल्ला (वय ३२ रा.संकेश्वर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर संकेश्वर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसचालकाला गतिरोधक न दिसल्याने हा अपघात झाला. घटनेची नोंद शहर पोलीसात झाली आहे.

सोमवारी मध्यरात्री भरधाव वेगात असलेल्या चालक यासीन मुल्ला याला गतिरोधक न दिसला नाही.त्यामुळे पुढे निघालेल्या मालवाहू ट्रकला मागून बसची जोरात धडक बसली.ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. तर चालक यासीन हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी संकेश्वर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे व अक्षय सारापुरे यांनी याची माहिती निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ,सहाय्यक उपनिरीक्षक एस.एस.चिकोडी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सदर बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते.अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.याबाबत ट्रकचालक विनोद कालीदास कांबळे (रा. नांगरगाव ता.उदगिरी जि.लातूर) यांनी बसचालका विरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास कार्जोळ यांनी चालवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news