

निपाणी : माजी आ. काकासाहेब पाटील यांचे उत्तरकार्य रविवारी पार पडले. प्रतिमा पूजन करून माजी आ. पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध भागांतून नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी प्रतिमेचे पूजन सुपुत्र सुजय पाटील यांच्या हस्ते झाले. स्नुषा उमा पाटील, कन्या सुप्रिया पाटील, जावई दत्तकुमार पाटील, नातू राघवेंद्र पाटील, नात संस्कृती पाटील, भाऊ अण्णासाहेब पाटील, दादासाहेब पाटील आदींनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
माजी आ. काकासाहेब पाटील यांच्या निधनाने आमचे बळ हरपल्यासारखे वाटत आहे. त्यांनी पक्षापेक्षा लोकांचा विश्वास कधीच कमी होऊ दिला नाही. अनेक विकासकामांमध्ये त्यांचा पुढाकार होता. लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानली. आज त्यांच्या जाण्याने निपाणी मतदारसंघ एका खंबीर नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, राजेंद्र पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रविवारी साखरवाडी येथील काँग्रेस कार्यालयामध्ये माजी आ. काकासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री जी. परमेश्वर आदींनी शोकसंदेश पाठवत आदरांजली वाहिली तसेच कर्नाटकसह-महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी मंत्री, आमदारांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या भेटून पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.